बुद्धिबळ
काय असतो हा खेळ, बुद्धिबाळ?
का खेळवा हा खेळ बुद्धिबळ?
राजा, वाझिर, हत्ती, घोडा, उंट, आणि प्यादी,
बिद्धिबळ खेळण्याची मजा आहे न्यारी,
काळे विरुद्ध पांढरे असतात एकच पटावर,
खेळतांना खूप मजा येते सांगतो शपतेवार.
काळा वजीर काळ्या घरात आणि पांढरा वजीर पांढऱ्या घरात,
पूर्ण खेळ खेळायचा असतो या
चौसष्ठा घरात.
कोपऱ्यात हत्ती, शेजारी घोडा त्या नंतर उंट.
हत्ती चालतो सरळ, आणि तिरका चालतो उंट.
सुरवात करावी पांढरा प्यादानी चालून दोन घर,
किंवा करतो घोडा उडी मारून अडीच घर.
बुद्धी होईल ताल्लाख खेळून बुद्धिबळ.
मनाचाही संयम वाढेल खेळून बुद्धिबळ.
गर्व आहे मला, की भरतीयनी शोधला बुद्धिबळ,
आज जगभरात खेळाला जातो हा खेळ बुद्धिबळ.
भूषण कुलकर्णी
30 मे 2024