१) भीम म्हणजे काय? : भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) असे या अॅपचे पूर्ण नाव आहे. UPI या पैसे पाठवण्याच्या पद्धतीशी जोडलेले असल्यामुळे याद्वारे पैश्यांचे व्यवहार सुरळीतपणे करता येणार आहेत.
२) कसे काम करते? : भीम अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या बँक खात्याची माहिती यात भरा. आपले बँक खाते UPI शी जोडले गेले असल्याची खात्री करून घ्या. खात्याची माहिती भरल्यानंतर त्वरित आपण पैश्याचे व्यवहार करू शकतो.
३) पैश्याचे व्यवहार कसे करायचे? : एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर जसे रोख रक्कम आपण देत असतो, त्याच प्रकारे भीम अॅपच्या सहाय्याने रक्कम पाठवायची आहे. रक्कम पाठवणाऱ्याची माहिती भरून सेंड म्हणल्यावर त्वरितच पैसे दुकानदाराच्या खात्यात जमा होणार. पेटीएम सारखे यात पैसे आधी जमा करावे लागणार नाहीत.
४) QR कोड : भीम अॅपमध्ये QR कोडची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराच्या वेळी, माहिती न भारता फक्त QR कोडच्या स्कॅनिंगद्वारे पैसे पाठवणे शक्य होणार आहे.
५) व्यवहार मर्यादा : भीम अॅपद्वारे दिवसाला २० हजार रुपयांचे व्यवहार करता येणार आहेत. मात्र एका वेळी कमाल १० हजार रुपये पाठविण्याचीच मर्यादा घातली गेली आहे.
६) आवश्यक बाबी : भीम अॅप वापरण्यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट, बँक खाते, खात्याला UPI शी संलग्नित करणे आवश्यक आहे.
७) कोणकोणत्या बँक ‘भीम’ सेवा पुरविणार? : भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस तसेच एचडीएफसी बँक व इत्यादी पहिल्या टप्प्यात भीम अॅप सेवा पुरविणार आहेत. तसेच अन्य बँकेत देखील केवळ IFSC कोडच्या माध्यमातून या सेवेला मान्यता मिळेल.
८) कोठे आहे ‘भीम’ उपलब्ध : भीम अॅप आपण अँडॉईड प्ले स्टोअर वरून तसेच अॅपलच्या अॅप स्टोअर वरुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतो.
९) भीम अॅपचे शुल्क : हे अॅप वापरण्यासाठी अथवा डाऊनलोड करण्यासाठी कोठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. भीम अॅपची सेवा पूर्णपणे मोफत आहे.
१०) कोणी तयार केले हे अॅप : भारतीय राष्ट्रीय भरणा कॉर्पोरेशन (एन. पी. सी. आय.) या संस्थेने ‘भीम’ अॅप तयार केले आहे. याचे संपूर्ण संचालन या संस्थेद्वारे केले जाईल. ही संस्था भारत सरकार द्वारे व्यवहार सुरळीततेकरिता चालविली जाते.

No comments:
Post a Comment