Monday, 2 January 2017

स्मशान माझा गुरु

 "भाकरीचं नातं घट्ट असतं. भिक्षेची भाकर वाटून खाल्ली आणि त्यावर मी जगले. तरुण आसल्यामुळे माझं वय हाच माझा धोका होता, जिवंत माणसांच्या कळपापेक्षा मला स्मशान अधिक सुरक्षित वाटायचं. मला माहीत होतं की, मेल्याशिवाय माणसं स्मशानात येत नाहीत आणि रात्री भुताच्या भीतीने तिथं कोणीच फिरकत नाही. कोणी जर चुकूनमाकून आलं तर मलाच भूत समजून पळ काढायचे. माझी सुरक्षा ही फक्त स्मशानानं केली आणि स्मशानानंच मला जगायला शिकवलं.
           स्मशानच माझा गुरु आणि आधार झालं. स्मशानात राहत असताना लोक गेले की, मी प्रेताच्या आगीजवळ बसून ऊब घेत असे. काही वेळा त्याच आगीवर भाकर भाजून घेत असे. मग माझा आणि त्या प्रेताचा एक अव्यक्त संवाद मनातल्या मनात व्हायचा.
           प्रेत मला सांगायचं, 'तु एकटी आहेस म्हणून का रडतेस ? माझ्याकडे बघ. मी एकटाच जळतोय आणि माझी मुलं घरी संपत्तीसाठी भांडत आहेत. आपण आलोही एकटेच आणि जाणारही एकटेच.' कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नही लेती."

          हे बोल आहेत...

     - सिंधुताई सपकाळ-
   जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
        ( अनाथांची माय )
 उ पवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला
असता.
..देव मनात ठेवा आणी एखाद्या उपाशी पोटी माणसाला खायला घाला.

No comments:

Post a Comment