शाळा - बालगीत
एक चिमुकली आईस पुसते, शाळा म्हणजे काय ग ?
कुशित घेउनी आई सांगते शाळा म्हणजे मंदिर ग.
एक चिमुकली आईस पुसते,
गुरू म्हणजे कोण ग ?
कुशित घेऊनी आई सांगते गुरू म्हणजे देव ग.
एक चिमुकली आईस पुसते पुस्तक म्हणजे काय ग ?
कुशित घेऊनी आई सांगते कृष्णा सारखा सखा ग.
एक चिमुकली आईस पुसते अभ्यास म्हणजे काय ग ?
कुशित घेउनी आई सांगते अभ्यास म्हणजे पूजा ग.
एक चिमुकली आईस पुसते गणवेश म्हणजे काय ग?
कुशित घेऊनी आई सांगत गणवेश म्हणजे व्रत ग.
एक चिमुकली आईस पुसते, शाळा म्हणजे काय ग ?
कुशित घेउनी आई सांगते शाळा म्हणजे गर्भ ग.
एक चिमुकली आईस पुसते,
गुरू म्हणजे कोण ग ?
कुशित घेऊनी आई सांगते गुरू म्हणजे माता ग.
एक चिमुकली आईस पुसते पुस्तक म्हणजे काय ग ?
कुशित घेऊनी आई सांगते पुस्तकं म्हणजे बाळकडू ग.
एक चिमुकली आईस पुसते अभ्यास म्हणजे काय ग ?
कुशित घेउनी आई सांगते वाघीनीचे दूध ग.
एक चिमुकली आईस पुसते गणवेश म्हणजे काय ग?
कुशित घेऊनी आई सांगत वडिलांची माया ग.
Bhushan Kulkarn
22 / 04 / 24
No comments:
Post a Comment