Wednesday, 8 May 2024

एका 'मस्त 'च मनोगत भूषण कुलकर्णी - कविता

 एका 'मस्त 'च मनोगत 


द द दवा, नकोशी वाटते,

दवा खाल्यावर, झोप खूप येते.


स स सखी, हवेशी वाटते,

त्रास कळल्यावर, सोडूनी जाते.


स स सौंशय, वाळवी सारखा असतो,

मायची नाती, पोखरून टाकतो.



प प परमेश्वर, मलाच हेरतो.

 माझ्या आजारातून, व्यक्त तो होतो.


ड ड डॉक्टर, भयाण वाटतो,

खूप खूप प्रेमाने, सल्ले तो देतो.


स स सेल्फ हेल्प, आधार देतो,

गृप मध्ये गेल्यावर, खूप धीर येतो.



भ भ भ्रम, जेव्हा मोडून जाईल,

म मा माया, तेव्हा नष्ट होईल.

 जेव्हा माया नष्ट होऊन जाईल,

तेव्हा देव माझा कवेत घेईल.


- Bhushan Kulkarni

7 May 2024

No comments:

Post a Comment