Monday 27 May 2024

जरा थोडं आधी कळू दे, - कविता - भूषण कुलकर्णी

 देवा,

जरा थोडं आधी कळू दे,


लहानपण संपत आलं,

शाळा संपत आली,

आजी, आजोबा म्हातारे झाले,

कुल्फी वितळट आली,



देवा,

जरा थोडं आधी कळू दे,


तरुणपण संपत आला ,

अभ्यास संपत आला,

आई, बाबा, म्हातारे झाले,

मैत्रिणीच लग्न झाले,

गॅस बंद करायचा राहून गेला,

टायर मधील हवा चेक करणे राहून गेल, 

थाड व्यायाम करणे राहून गेलं,

मुलांन बरोबर खेळणे राहून गेलं,

मुलांचा अभ्यास घेणे राहून गेलं,


देवा,

जरा थोडं आधी कळू दे,


म्हातारपणा संपत आला,

तुझ नाव घ्यायच राहून गेल,

तब्बेत्ती कडे लक्ष दयच राहून गेल,

गाणे शिकायच राहून गेल,

बायकोवर प्रेम करणे राहून गेला,


भूषण कुलकर्णी

27 मे 2024

No comments:

Post a Comment