Friday, 10 May 2024

मला कळल नाही. भूषण कुलकर्णी - कविता

 कविता 3


मला कळल नाही.


लहान मूल जेव्हा म्हणत 'मला कळल नाहीं, 

त्याचा अर्थ

असा घ्यावा 'खरच' त्याला कळल नाही.


तरुण माणूस जेव्हा म्हणतो 'मला कळलं नाही '

त्याचा

अर्थ असा घ्यावा 'मला त्यात रस नाही.'


म्हातारा माणूस जेव्हा 

म्हणतो 'मला कळत नाही।

त्याचा अर्थ

असा घ्यावा

'मला आता उमजत नाही'



सखी जेव्हा म्हणते  'मला कळलं नाही.

त्याचा अर्थ

असा घ्यावा

 'तुला अजूनही कळत नाही,


बायको जेव्हा म्हणते


'मला कळत नाही.

त्याचा अर्थ असा घ्यावा 'तुझ आता काही खर नाही.


आई जेव्हा म्हणते 'मला कळलं नाही.

नऊ महिने तुला पोटात ठेवल आणि मला कळल नाही.


 मित्र जेव्हा म्हणतो 'मला कळत नाही'.

चिड्डीत असल्यापासून ओळखत आहे 'मला कळलं नाही.'


ज्ञानी जेव्हा म्हणतो 'मला कळल नाहीं, 

त्याचा अर्थ

असा घ्यावा सगळं कळेल यावढी माझी क्षमता नाही.


संत जेव्हा म्हणतो 'मला कळले नाहीं, 

त्याचा अर्थ

असा घ्यावा काही कळन्या सारखे नाही.


देव जेव्हा म्हणतो 'मला कळले नाहीं, 

त्याचा अर्थ

असा घ्यावा तुला अजून कसे कळत नाही.


अज्ञानी  जेव्हा म्हणतो 'मला कळल नाहीं, 

त्याचा अर्थ

असा घ्यावा असं kay आहें जे मला कळत नाही.


खर सांगू का, मी काय लिहत आहें मला कळलं नाही.


Bhushan Kulkarni

10 May 2024

No comments:

Post a Comment