Thursday 16 May 2024

सुई दोरा - कविता - भूषण कुलकर्णी

 सुई दोरा


किती छान असतो ना हा सुई दोरा, जोडण्याचा काम करतो  हा सुई दोरा.


सुईत दोरा ओवता येतो का मुलीला? असं विचारून नावरदेवी ची पसंत करायचा हा सुई दोरा.


आता नाही येत दोऱ्यात सुई ओवता, चाळशी आली, चष्मा लागला, येचि परीक्षा घायचा हा सुई दोरा.


कपडे फाटले, शिवाले सुई दोऱ्यांनी, आब राखतो हा सुई दोरा.


सुंदर नक्षी, छान छान रंग,

कपडे आकर्षक बनवतो हा सुई दोरा.


दातात काही अडको, किंवा पायात काही घुसो, कंगवा स्वच्छ करण्यासाठी, झटकन कामी येतो हा सुई दोरा.


प्राणायामत , शरीर आणि मान,किंवा जीवनात, शरीर आणि आत्मा, यातल संतुलन साधतो , हा स्वासाचा सुई दोरा.


भूषण कुलकर्णी

16 मे 2024

No comments:

Post a Comment