Monday, 20 May 2024

वा शाब्बास !! कविता - भूषण कुलकर्णी

 वा शाब्बास !!


कान आसूसतात ऐकायला,  वा शाब्बास !

पाठ म्हणते मला थोपटा , वा शाब्बास.


नक्की कोणाला हवा असते हे, वा शाब्बास.

कधी विचार केला, का हवे असते, हे वा शाब्बास?


कधी स्पुर्ती देत हे, वा शाब्बास.

कधी मिंधा बनवते हे, वा शाब्बास.


कोणी दिलं नाही, वा शाब्बास.

तर मी स्वतःला द्याव, हे वा शाब्बास.


विचार करून द्यावं, हे वा शाब्बास.

विचार करून घ्यावं, हे वा शाब्बास.


भूषण कुलकर्णी

20 मे 2024

No comments:

Post a Comment