Tuesday, 14 May 2024

लाटण भूषण कुलकर्णी - कविता

 लाटण


लकडाचा जरी असलो मी, जनावते मला.

पोळ्या करणाऱ्या स्त्री च्या भावना कळतात मला.


आज बसलो मुलाच्या पाठीत, जनवलं मला.

आई ला खूप राग आला कळलं मला.


आज पोळ्या पात्तळ झाल्या, जनवला मला,

महिना अखेर आला, कळलं मला.


आज पोळ्या ऐवजी पुऱ्या, जाणावल मला.

आनंदाचा दिवस किंवा संणं,

कळलं मला.


आज पोळ्या लाटणाच्या वेग वाढला, जनवलं मला.

बहुतेक नव्या सुनेने पोळ्या केल्या कळलं मला.


आज तिन पिढ्या सोबत आहें, जनवलं मला.

स्त्रीच्या भावना व्यक्त कारण्याच, मी एक साधन, कळलं मला.


स्त्री खूप छान, स्वच्छ, जपून ठेवते, जनवलं मला.

तिच्या आयुष्य चा खूप महत्वाचा भाग आहें मी, कळलं मला.


भूषण कुलकर्णी

14 मे 2024

No comments:

Post a Comment