बघता बघता
अगदी काल पर्यंत अंगणात रांगत होती, बघता बघता झाली लग्नाची.
अगदी काल पर्यंत बोट धरून चालत होता, बघता बघता आधार द्यायला लागला.
अगदी काल पर्यंत एक रोपटे होत, बघता बघता मोहर आला .
अगदी काल पर्यंत अंड्यात होत, बघता बघता आकाशाला गवसणी घालू लागल.
अगदी काल पर्यंत एक एक थेंब पडत होते , बघता बघता तळ साठल.
अगदी काल पर्यंत एक सामान्य माणूस होता , बघता बघता महामानव झाला.
अगदी काल पर्यंत सगळं ठीक होती, बघता बघता सर्व संपलं.
अगदी काल पर्यंत सगळं अस्तव्यस्त होती, बघता बघता सगळं छान झालं
भूषण कुलकर्णी
23 मे 2024
No comments:
Post a Comment